हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
भेंडीबाजार म्हणलं की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहराम पाडा म्हणलं की मातोश्रीला त्रास होतो, असा टोलाही शेलारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला. सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान तर ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे.भेंडीबाजार आणि बेहराम पाडा ही दोन्ही ठिकाणं मुस्लिम वस्ती म्हणून परिचीत आहे. त्यावरुनच आशिष शेलार यांनी प्रविण दरेकरांच्या भाषणाचा धागा पकडत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे अजूनही वस्तादच आहेत. ते आजही सगळ्यांशी एकटेच लढत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.ज्यावेळी जंगलात वादळ आलं होतं तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होतो, असा हल्लाबोल दरेकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’