हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्या दौरा पार पडला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. प्रभू रामचंद्राशी नातं असल्याचं दाखवण्यासाठी शिवसेनेला अयोध्येत जावं लागतं. पण, आमची छाती फाडली तरी तुम्हाला त्यात रामच दिसेल, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.
अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला टोमणा हाणाल्यानंतर भाजपचं पित्त खवळलं. विशेष म्हणजे या दौऱ्यात काँग्रेसचे मंत्री सुद्धा सहभागी होते. दरम्यान, ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला डिवचल्यानं चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९५ वर्षापूर्वीच हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे. आमचा हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच मान्य होता. आता तो जर काँग्रेसलाही मान्य झाला असेल तर आनंदच आहे, असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना लगावला.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.