महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आघाडी सरकारमध्ये फूट पडली असल्याचीही अफवा पसरवली जात आहे. दरम्यान आज पुणे येथील कार्यक्रमात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला. “आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असे बावनकुळेंनी इशारा दिला आहे.

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपकडून संकल्प यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर 25 लाख युवांना जोडण्याचे अभियान सुरू आहे. यावेळी बावनकुळेनी राज्य सरकारवर ओबीसी, मराठा आरक्षण मुद्यांवरून निशाणा साधला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण गेले. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही, असा आरोप बावनकुळेंनी केला.

दरम्यान, बावनकुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. वेळेत वीजबिल न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. असे सांगत हे सरकार मुघलांसारखे वागत असल्याचा आरोपही भाजपनेते बावनकुळेंनी केला.

Leave a Comment