अजित पवार यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं : चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. पुणे येथे वाढणाऱ्या कोरोनाची स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थिती विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून भेटी देत पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी मागणीही केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुणे येथील कोरोना परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर पुण्यातील प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी राज्य सरकारच्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला. तसेच त्यांनी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

पुणे येथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तेथील परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस, आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थिती विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडूनही मदत केली जात आहे. पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून सातत्याने निर्बंध वाढवले जात आहेत. तर दुसरीकडे प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच या ठिकाणी मृत्यूंची संख्याही वाढत आहे. असा परिस्थितीत राज्यातील विरोधी पक्षतील नेत्यांकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यावर आरोप केले जात आहेत.