आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परिस्थिती; चित्रा वाघ यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेवरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडला. यावरून एकच गोष्ट लक्षात येतेय की, आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परिस्थिती झाली असल्याची टीका वाघ यांनी केली.

यावेळी टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची घटना आज घडली. हि अत्यंत दुर्दैवी आणि प्रत्येक राज्यातल्या नागरिकांची मान शरमेने खाली जाणारी घटना घडली आहे. हि घटना ज्या राज्याचा कारभार हाकला जातोय त्या मुंबईतील मंत्रालयात घडली. हि घटना घडली कशी? या ठिकाणी दारूच्या बाटल्या कशा काय आल्या? या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे हे गेली दीड वर्षे फिरकलेच नाहीत. त्यामुळे येथील सामान्य प्रशासन करतंय काय? सध्या राज्याची अवस्था हि आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातंय, अशी झाली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

भाजपनेत्या चित्रा वाघ यांच्यापूर्वी सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांच्या घटनेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याप्रमाणे या घटनेबाबत विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

Leave a Comment