हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून संप, आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. “ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलं आहे. हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय; असल्याचे वाघ यांनी म्हंटले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हनाले आहे की, ऐन दिवाळीत २ हजार ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय. नोकरी घालवणं, उपाशी मारणं, बेघर करणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं हाच का महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम? आहे का? असा सवाल वाघ यांनी केला आहे. हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय..
नोकरी घालवणं..
उपाशी मारणं..
बेघर करणं..
आत्महत्येस प्रवृत्त करणं..हाच का #MVA चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?
हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय#निलंबन_सरकार चा धिक्कार असो!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 12, 2021
राज्यातील प्रवाशांबद्दल सांगायचे झाले तरअजूनही वाट पाहिन पण एसटीने जाईन एवढा प्रवाशांचा एसटीवर विश्वास आहे. सोन्याची अंडी उबवणा-यांना एसटीची व जनतेची नाळ कशी कळणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे सरकार वाया गेलेल्या मुलांसारखं वागत आहे. 70 वर्षाच्या म्हाता-या आईला आपल्या एसटीला ‘वृद्धाश्रमात’ पाठवलं जात आहे. आईचं चांगलं पांग फेडतय हे सरकार. अशा निलंबन सरकारचा धिक्कार असो !, असे वाघ यांनी म्हंटले आहे.