Wednesday, March 29, 2023

संजय राऊत आम्हाला सुद्धा अरेला कारेची भाषा येते, हे ध्यानात ठेवा; चित्रा वाघ यांचे प्रतिउत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शपथ घेतली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मंत्रिपदाबाबत बरळलेण्यांची भाषा केली. यावरून आज भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिले आहे. “संजय राऊत तुम्ही महिलांचा सन्मान करणारी विधाने करा, नाहीतर आम्हालाही आरेला कारे अशी भाषा येतेहे तुम्हीं ध्यानात ठेवा,” असे वाघ यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री नारायण राणे व केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल टोकलेबाजी केली. यामध्ये राऊत यांनी राणेंना टोला लगावला तर इराणी यांच्याबद्दल बरळणारी भाषा वापरली. राऊत यांनी वापरलेल्या शब्दांचा आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी ट्विट करून खासदार संजय राऊत यांना शब्द महिलांविषयी बोलताना शब्द जपून वापरावे तसेच सन्मानपूर्वक बोलावे असे म्हंटले आहे.

- Advertisement -

भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहे कि, “शिवसेनेचे खासदार संजय राऊत कधीनव्हे तो खरे बोलले. माननीय नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. आणि ते खरे आहे. ती वाढतच जाणार आहे. म्हणूनच ते शिवसेनेला झेपलेलं नाही. असो, मी अपेक्षा करते कि तुमच्या बंधूंनाही मंत्रिपद मिळेल. आणि तुम्हालाही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानायचे सौभाग्य प्राप्त होईल. काल केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी जे बरळले. मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगावे. मग मी तुम्हाला स्मृती इराणी यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन.”