लिव्ह इन म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही फक्त सोबत राहणं; चित्र वाघांनी अबू आझमींना फटकारले

मुंबई । लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमींना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर केली आहे.

“देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन… व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला” अशा शब्दात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला. त्यावर चित्रा वाघ यांनी आझमींना चांगलेच फटकारले.

नेतेमंडळी महिलांना बदनाम करण्यासाठी अशी वक्तव्ये करत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. अनेक नेत्यांचे नाव सध्या बलात्कार प्रकरणांमध्ये आल्यामुळे त्यांना वाचविण्याचे काम त्यांचे सहकारी, पक्ष आणि आघाडी करत आहे. महिलाच कशा चुकीच्या आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यामागे स्वत:ची प्रतिष्ठा वाचवण्याचा राजकीय डाव आहे, असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला.

You might also like