हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबद्दल महत्वाचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमधून यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचे विधान केले आहे. “यशोमती ताई तुम्ही आमची आन बान आणि शान आहात. असे म्हणत वाघ यांनी महिला आयोगाला अध्यक्षपद मिळवून देण्याच्या यशोमती ठाकूर यांच्या मागणीला पाठींबा दर्शविला आहे.
आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, यशोमती ताई
तुम्ही आमची आन बान आणि शान आहात. राज्यातील महिलांचं मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करताय. महिला आयोगाला अध्यक्ष द्या म्हणून तुमच्या मागणीकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर हिसकावून घ्यायची तुमची ताकत आहे. आम्हीही सोबत आहोत. कारण हा विषय तुमचा माझा नाही तर राज्यातील तमाम भगिनींचा आहे.”
यशोमती ताई
तुम्ही आमची आन बान आणि शान आहात
राज्यातील महिलांचं मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करताय
महिलाआयोगाला अध्यक्ष द्या म्हणून तुमच्या मागणीकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर हिसकावून घ्यायची तुमची ताकत आहे
आम्हीही सोबत आहोत कारण हा विषय तुमचा माझा नाही तर राज्यातील तमाम भगिनींचा आहे pic.twitter.com/Tsb3CiltLX— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 26, 2021
चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, यशोमती ठाकूर यांनी म्हंटल आहे की, सहा महिन्यांपूर्वीच महिला आयोगाला अध्यक्ष द्या म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे फाईल दिली होती. परंतु त्यावर अद्याप कोणताही विचार राज्य सरकारकडून झालेला नाही. यशोमती ताई तुमच्या मागणीकडे जर सरकार लक्ष देत नसेल, मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यायची तयारी दाखवा, आम्हीही सोबत आहोत कारण हा विषय तुमचा माझा नाही तर राज्यातील तमाम भगिनींचा आहे”, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.