“उद्धवजी फार चांगली कार चालवतात, पण…” देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलाच टोला लगावला आहे. ‘उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही’, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेनेचे नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही. सरकारमध्ये ट्रॅफिक सुरुच राहते. या सर्व गोष्टींबद्दल जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन तशा प्रकारचं एक ट्वीटही करण्यात आलं आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
”मी उत्तम गाडी चालवतो, उत्तम चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही. मास्क घालणे, हात धुणू आणि अंतर ठेवणे ही आपली जीवनशैली आता बनलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

ती जीवनशैली काही वर्ष किंवा महिने तरी आपल्याला अंगीकारावी लागणार आहे. व्हॅक्सिन आल्यानंतरही बूस्टर डोस द्यावे लागलात. तसेच सुरक्षा नियमांचे बुस्टर डोस दिले गेले पाहिजेत, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. विशेष म्हणजे त्याला चंद्रकांत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment