हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज मुंबईत एका कार्यक्रमात भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. अनैसर्गिक युतीने हे तिन्ही पक्ष एकत्रित आलेले आहेत. ज्या प्रकारे गुळाच्या भेळीला मुंगळे चिपकतात. त्याप्रकारे महाविकास आघाडीतील पक्ष व त्यातील नेते हे सत्तेला चिपकलेले आहेत. या सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
मुंबईत टीव्हीजे हा लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमास भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी भाजप जन आशिर्वाद यात्रा, महाविकास आघाडी सरकार युती, शेतकरी नुकसान भरपाई प्रश्न आदींवरून फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे काम हे महाविकास आघाडी करत आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा दिलासा न देण्याचे काम सरकार करीत आहे. सध्या शेतकऱ्यांना जिवंतपणी नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर तरी सरकारने भरपाई, मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे.
जन आशीर्वाद यात्रेवरून आघाडी सरकारकडून टीका केली जात असल्याने त्याचाही देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला. “या सरकारला जत्रेचा अनुभव आहे. जन आशीर्वाद यात्रेचाही अनुभव आता येऊ लागला आहे. आमच्या चारही जन आशीर्वाद यात्रेला चान्गला प्रतिसाद मिळत आहे. त्याची या सरकारने दास्ती घेतल्याचेही पहायला मिळत असल्याचे,” फडणवीस यांनी सांगितले.