मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज प्रश्न उत्तराच्या तासात एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सौर पंपाच्या संदर्भात त्यांनी सभागृहात प्रश्न विचारला होता. तसेच नव्या आदीवासी विकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर देखील एकनाथ खडसे चांगलेच संतापले. सर्वाधिक कुपोषण ग्रस्थ बालक आपल्या कार्यकाळात जन्माला आले आहेत असे म्हणत एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच बरसले.
दरम्यान आज हि विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर विरोधी घोषणांचा पाऊस पडला आहे. तर एकनाथ खडसे विधान सभेच्या सभागृहात जाताना दिसताच त्यांना पाहून निष्ठावंतांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. तर सुरेश धस आणि राहुल कुल विधान भवनाच्या आवारात दिसताच विरोधकांनी आयाराम गयाराम जय श्रीराम अशा घोषणा देण्यास सुरवात केली.
जुन्या निष्ठावान आमदारांना संधी मिळत नाही. मी राजीनामा दिल्यानंतर कित्येक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र त्यांनी कोणीच राजीनामा दिला नाही. आता निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तर मंत्री मंडळ विस्ताराबद्दल एकनाथ खडसे यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला नाराजी बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे.