जयंत पाटलांवरील टीकेचा हसन मुश्रीफांकडून समाचार; पडळकरांवर केला ‘या’ शब्दात पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारा दरम्यान भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली. त्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “भाजपने पडळकरांना आवरलं पाहिजे. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही, असा पलटवार मुश्रीफांच्या केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवल्याचा आरोप करते मात्र वस्तुस्थिती तशी नाही. 2011 ला जातिनिहाय जनगणना झाली असताना त्यांनी डेटा उपलब्ध करून दिला नाही. देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवली होती. मग कोणत्या आधारे केंद्र शासनाकडून डाटा मागण चुकीचा आहे, असे आज भाजप म्हणत आहे, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील याच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टिकेचाही मुश्रीफ यांनी समाचार घेतला. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, आपण काय बोलतो याचे भान पडळकरांनी ठेवावे. भारतीय जनता पक्षाने पडळकर आवरल पाहिजे. पडळकरांच्या अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही. अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली आहे हे भाजप ने ओळखण्याची गरज असल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Leave a Comment