विलिनीकरण हा विषय मार्गी लावावा ही आमची भूमिका – गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत चरचा करण्यात आल्यानंतर आज पुन्हा परिवहनमंत्री अनिल परब तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केवळ विलीनीकरण हा विषय मार्गी लावावा हि आमची भूमिका असल्याचे सांगितले.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या चौदा दिवस झाले एसटी कर्मचारी आपल्या मुलाबाळांसमवेत आंदोलन करीत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर संप करीत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरण करावे एवढीच मागणी केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या संपाबाबत त्यांचा विलिनीकरण हा विषय मार्गी लावावा अशी आमची भूमिका आहे. सकारात्मक चर्चा सुरु आहे, अधिकृत निर्णय आल्यानंतरच पुढील दिशा ठरवणार आहे. अजून कोण समाधान आहे कोण नाराज आहे? याबाबत अंतिम निर्णय नंतर घेणार असल्याचे, पडळकर यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून असा आहे प्रस्ताव –

1. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्ताव
2. किमान 5000 ते कमाल 21 हजारापर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव
3. कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्त वाढ करमार
4. एसटी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला वेळेत पगार मिळण्याची खबरदारी
5. प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेला पगार होण्याची खबरदारी घेणार
6. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन 50 हजाराहून जास्त असल्याल त्यांना कमी वेतनवाढ