हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. “स्व.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना 90 टक्के समाजकारण आणि 10 टक्के राजकारणासाठी केली होती. उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय. आता जनाब संजय राऊत यांचं कौतुक करतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना व ठाकरे सर्कावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 45 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी जीव गमवला अशात त्यांच्याविरोधात दंड थोपटणे म्हणजे पुरूषार्थ नाही. स्व.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना 90 टक्के समाजकारण आणि 10 टक्के राजकारणासाठी केली होती. उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय. आता जनाब संजय राऊत यांचं कौतुक करतील, असे पडळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
४५ मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी जीव गमवला अशात त्यांच्याविरोधात दंड थोपटणे म्हणजे पुरूषार्थ नाही. स्व.बाळासाहेबांनी #शिवसेनेची स्थापना ९०%समाजकारण आणि १०% राजकारणासाठी केली होती.उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी १००% राजकारण करतंय.आता जनाब @rautsanjay61 यांचं कौतुक करतील.@SaamanaOnline pic.twitter.com/PmcSIMu6fM
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) November 22, 2021
दरम्यान काल एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. सरकारचा तेरावा आणि चौदावा घालणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे.