संजय राऊत बिनबुडाचा लोटा, खातो सेनेचं आणि जागतो पवारांना; पडळकरांची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहेत . याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा असून खातो सेनेचं आणि जागतो पवारांना अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला

जे आदिवासींना तेच ओबीसींना हा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीसांनी १००० कोटींचे बजेट मंजूर केलं होत . त्यातील एकही रुपया संजय राऊतच्या मालकाने दिलेला नाही याबद्दल राऊतांनी बोलायला पाहिजे असे गोपीचंद पडळकर यांनी म्हंटल. ओबीसी समाजाकरिता देवेंद्र फडणवीसांनी २३ जीआर काढले हे संजय राऊत याना माहित नाही. त्या २३ जीआर मधील एकही जीआर ची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही असं म्हणत पाडळकरांनी ठाकरे सरकारचा निषेध केला

भावाभावांमध्ये भांडण लावून दस्तलेखक म्हणून भावाचा राजीनामा घेतला आणि आता काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे किती अजित पवारांच्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या मागे फटाके लावायचे काम करतोय. हा असा हुजऱ्या ना जन्माला येईल ना येणार असे गोपीचंद पडळकर यांनी म्हंटल

Leave a Comment