हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावरून आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?, असा चिमटाही त्यांनी काढला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे Work From Mantryalay कधी करणार?, कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी आलं… त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली. पण, मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT हे Work From Mantryalay कधीकरणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरेपडली, झाडेकोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट,मुख्यमंत्री घरात बसलेत. @AjitPawarSpeaks यांनीमंत्रालयात आपत्तीनिवारण कक्षात भेटदेऊन पहाणी तरी केली पण..2
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 17, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना work from home करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? @Dev_Fadnavis मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना work from home करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतक..3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 17, 2021
महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळविला आहे. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.