महाविकास आघाडीतील नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्याबाबत कागदपत्रे ईडीला देणार असल्याचे सांगितले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता, अशी टीका केली. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “महाविकास आघाडी सरकारमधील नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत,” असे सोमय्यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, खरं आहे. ते आता शांत आहेत. ते शांततेत सुपाऱ्या देत आहेत. या सुपारीबाज माफियांना घाबरण्याची गरज नाही.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी सातारा येथील सभेत भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर टीका केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो, असे शिंदे यांनी म्हंटले होते. शिंदेंच्या टीकेला सोमय्या यांनी प्रतिउत्तर दिले आहे.