हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यामागे ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. दरम्यान त्यांनीदापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली त्यामुळे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ठाकरे सरकार चे मंत्री अनिल परबचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांचा कडील सुनावणीत दाखल केले सांगीतले.
दरम्यान यापूर्वी किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानिसर त्यांनी परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सप्टेंबरमध्ये दिली होती.
ठाकरे सरकार चे मंत्री अनिल परबचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांचा कडील सुनावणीत दाखल केले सांगीतले@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/TcTUVIP1T0
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 8, 2021
मंत्रिमंडळातील मंत्रीच अनधिकृत बांधकाम करत आहे. सचिव रिसॉर्ट अनधिकृत घोषित करतात. तरीही उद्धव ठाकरे परब यांना मंत्री म्हणून कायम ठेवतात. परब यांची हकालपट्टी तर होणारच. पण त्यांच्याविरोधात फौजदारी आणि सिव्हील कारवाई करावी लागणार असून हे काम भाजप करणार आहे, असेही सोमय्या यांनी म्हंटले आहे.