उद्धव ठाकरे निष्क्रिय, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर आजही ठाम- नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील उद्योगधंदे कोलमडून पडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोळे मिटून आहेत. लोकांना पगार मिळत नाहीत. तरी मुख्यमंत्री फक्त लॉकडाऊन करतायत. ते निष्क्रिय असल्यामुळे प्रशासन चालवू शकत नाहीत. त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच मागणी केली होती. या मागणीवर मी आजही ठाम असल्याचे भाजप नेते नारायण राणे म्हणाले. ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद असून सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर ३ ते ४ मुख्यमंत्री आहेत अशी जळजळीत टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. गेल्या अनेक महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीतून बाहेर पाऊल टाकलेले नाही. ते बाहेर पडले तरी फार काही बोलत नाहीत. अनेक महिने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी आदेश पाळत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोणी ठेवणारही नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले

मुंबई भकास करण्याला शिवसेना जबाबदार
मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर भकास होत चाललं आहे. याला जबाबदार शिवसेना आहे. मुंबई महानगरपालिकेत जितका भ्रष्टाचार आहे, तसा अन्य कुठल्याही संस्थेत नाही. दिवाळखोरीत गेलेली बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने जात असल्याचीही टीका राणे यांनी केली. त्यामुळे आता राणेंच्या या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment