हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. शिवसैनिकांकडून नाशिक येथे भाजप कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. याबाबत मंत्री राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिवसेनेला ट्विटकरून आव्हान दिले आहे. “खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या अन् दोन हात करा, असे आपल्या ट्विटमध्ये निलेश राणेंनी म्हंटल आहे.
भाजपनेते तथा मंत्री नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.”
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनीही शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.