हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नावरून खडाजंगी झाली. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप नेते नितेश राणे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी एकच गोंधळ उडून गेला. परब यांनी राणेंना आसनावर बसून बोलायला सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसास गदारोळाने सुरुवात झाली. अधिवेशनास सुरुवात होताच प्रथम भाजप नेते नितेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
यावेळी आक्रमक झालेल्या मंत्री परब यांनी राणेंना खाली बसण्यास सांगितले. अगोदर खाली आसनावर बसावे. नंतर मग प्रश्न विचारआवे अशा सूचना परब त्यांनी राणेंना केल्या.
यावेळी अधिवेशनाचे उपाध्यक्षांनी भाजप नेते नितेश राणे यांना आपल्या आसनावर बसण्याची विंनती केली. आसन क्रमांक सांगितल्यानंतर राणे त्या ठिकाणी बसले. एकंदरीत अधिवेशनाच्या दुसऱ्याही दिवासाला खडाजंगीने सुरुवात झाली.