..तर भाजप कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत; नितेश राणेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपाऱयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. मात्र, या बंद विरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी दंड थोपटले आहे. भाजप कार्यकर्ते तसेच व्यापाऱ्याना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असा इशारा राणेंनी दिला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले की, महाराष्ट्रात लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्त महाराष्ट्रात आघाडी सरकारकडून बंद पुकारण्यात आलेला आहे. मात्र हा बंद पाळत असताना कोणत्याही प्रकारच्या व्यापाऱ्याना बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ नये. ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाही.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजप सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे याबाबत यावेळी आघाडी सरकारला त्यांनी इशारा दिला. त्यामुळे त्यांच्या या इशार्याला आता महाविकास आघाडी सरकारकडून काय प्रतिक्रिया आल्या जाणार हे पाहावे लागेल.

Leave a Comment