नाथभाऊंच्या भाजप सोडण्याच्या निर्णयावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली । एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय (Pankaja Munde comment on resignation of Eknath Khadse from BJP).

पंकजा मुंडे म्हणाल्या, “कालच रात्री मी एकनाथ खडसे साहेबांनी पक्षात राहावं आणि ते राहतील असं स्टेटमेंट दिलं होतं. आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी मी माध्यमांमधूनच ऐकली आहे. मी दिवसभर प्रवासात असल्याने याची बातमी मी काही पाहिलेली नाही. त्यामुळे मलाही धक्का बसला आहे.” यावेळी पंकजा मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर सविस्तर बोलणं टाळलं. तसेच देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदे घेणार आहेत. ते यावर सविस्तर बोलतील, अशी भूमिका मांडली.

‘भाजप कार्यकर्त्यांसाठी एकनाथ खडसेंचा राजीनामा धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा’
दरम्यान, राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांचा भाजप सोडण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा आहे. भाजप पक्ष वाढवण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खडसे यांनी आपला निर्णय बदलावा, असे मला वाटते. राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये त्यांचे मन रमणार नाही.”

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment