‘गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर’… दसरा मेळाव्याप्रकरणी FIR झाल्यावर पंकजांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंकजासह इतर जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.

यावर पंकजा मुंडेंनी “दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी परवानगी घेऊन गेले असता गुन्हा दाखल झाले. कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर” असं ट्विटरवर प्रतिकिया देताना म्हटलं. (Pankaja Munde first reaction after FIR for Online Dassera Melawa at Bhagwan Garh)

“अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

विजयादशमीच्या मुहुर्तावर (रविवार 25 ऑक्टोबर) सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक समर्थकांनी यावेळी गर्दी केली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली होती. भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (Pankaja Munde first reaction after FIR for Online Dassera Melawa at Bhagwan Garh)

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“दसऱ्या मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितलं आहे. परंतु ऑनलाइन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहेत. हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती, पण कोरोनामुळे ही हेलिकॉप्टरऐवजी गाडीनं आले. अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झाला आहे. भगवान बाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे. भगवान बाबा आशीर्वाद पाठीशी आहे हे इथे येताना जाणवत होतं. माझे बंधू महादेव जानकर यांच्याशिवाय माझा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in