मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला असे पंकजा मुंडे मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हणाला. झालं तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका अतिशय दुर्दैवी आहे. आमचा प्रामाणिक “नायक” कोण? आरक्षणाचा खरा “टक्का” कोण सांगेल आणि देईल, हा प्रश्न मराठा समाज बांधवांकडून विचारण्यात येत आहे असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे
मराठा आरक्षण यावर मा.सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असं खरंच कोणाला वाटलं होतं का?मराठा जीवनातील’ संघर्ष ‘हा मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला ..झालं तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी… अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

तसेच समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे..आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाई समोर आहे..आमचा प्रामाणिक “नायक” कोण ?कोण खरा “टक्का” आरक्षणाचा सांगेल आणि देईल हा प्रश्न माझे मराठा समाज बांधव विचारतात … असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.