मुंबई । अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या‘ कार्यक्रमाचा यावेळचा भाग इतर भागांपेक्षा वेगळा ठरला. त्याचं कारण म्हणजे यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यात ‘भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मंचावर हजेरी लावली. नेहमी हसऱ्या-खेळत्या सेटवर नेते मंडळींच्या हजेरीमुळे राजकीय वातावरण तापणार की काय, अशी शंका होती. मात्र मिश्कील टोलेबाजीत हा भाग चांगलाच रंगला. त्यात सर्वात कमालीचा क्षण म्हणजे जेव्हा पंकजा मुंडे रोहित पवार यांना माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू! असं म्हणताना दिसतात.
त्याच्या या विधानाने एकचं हशा पिकाला. त्यामागचं वेगळ कारण सांगायला नको. पंकजा यांचे राजकारणातील प्रतिस्पर्धी आणि भाऊ धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असून नुकतेच गोपीनाथ मुंडेंचे घनिष्ट सहकारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळं पंकजा या जेव्हा रोहित यांना, माझ्या घरातील व्यक्तींना नका फोडू अशी विनवणी करतात तेव्हा आपसूकच त्याचा संबंध वर्तमान राजकीय घडामोळींशी लावला गेला. मात्र, पंकजा मुंडे यांना ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर रोहित यांना अशी विनवणी का कारवाई लागली?
तर त्याचं असं झालं कि, पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत ‘चला हवा येऊ द्या’च्या हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते सेटवर सहभागी झालेल्या जोडप्यांसोबत एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. यामध्ये चलाखीने घड्याळाचा समावेश करण्यात आला होता. योगायोगाने भाजप नेते सुजय विखे यांची पत्नी धनश्री आणि पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांनी रिंग टाकली आणि नेमकी घड्याळावर पडली. (Pankaja Munde Rohit Pawar taunt on Chala Hawa Yeu Dya)
त्यानंतर तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पंकजांचा रोख होता, हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नाही. “सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत” असा टोमणा पंकजांनी मारताच “घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे” असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं.
ऐतिहासिक घटनेवर आधारित बहुप्रतीक्षित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमाचे पोस्टर रिलीज
सविस्तर वाचा- https://t.co/kY4ScccSWF#TheBattleofBhimaKoregaon #HelloMaharashtra #Bollywood— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 11, 2020
कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; तरुण व्यावसायिकाची 'आय लव्ह यू' लिहून हॉटेल रूममध्ये आत्महत्या
सविस्तर वाचा-👉 https://t.co/ljVnvsw0RT#HelloMaharashtra #sucide— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 11, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’