हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले करण्यात आले असून त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिले गेले नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत खुद्द भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. आम्हाला पक्ष संपवायला निघालाय अशी वाटत नाही. आम्ही पक्षाच्या निर्णयावर नाराज नसून आम्हाला पक्षाने घेतलेल्या निर्णय मान्य आहे,” असे पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर तसेच लोकांमध्ये प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिले गेले नसल्याने त्या नाराज असल्याची चरचा झाल्याची चर्चा होतू लागली आहे. याबाबत शुक्रवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या नाराजीच्या होत असलेल्या चर्चेवर पडता टाकला. यावेळी मुंडे म्हणाल्या कि, मी नेतृत्व नाही तर कार्यकर्ता आहे. केंद्रातील सर्व मंत्र्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. तसेच मी नाराज नाही तसेच मला वाटत नाही की भाजपला मला संपवायच आहे, असं म्हणत त्यांनी सामना अग्रलेखातील दावा खोडुन काढला.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या कि, मी पक्षात मी जेष्ठ नसून मी अजूनही लहान आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील निवडीबाबत जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे. त्यामुळे मी आणि प्रीतम नाराज असल्याचे कारण नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटल.