हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात अली. या कारवाईवर भाजप नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “राज्य सरकार नालायक आहे, लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच करत नाही. असं असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का?,” अशा शब्दात विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिर्डी येथील प्रांत कार्यालयासमोर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी टीका ते म्हणाले की, “पोलिसांची मदत घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. असे आतापर्यंत कधीच घडलेले नव्हते. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
यावेळी महाविकास अआघाडी सरकारवर विखे पाटलांनी निशाणा साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी कायदा शिल्लक आहे, हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्या नुसारच कारवाई करावी लागेल. महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार तोंडावर पडले आहे. न्यायालयाने सरकारच्या एक प्रकारे कानशिलात लगावली असल्याचेही विखे पाटील यांनी टीका केली आहे.