हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सुडाच्या भावनेतून महाविकास आघाडी कडून हा निर्णय घेतला गेला आहे, असा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
राम कदम यांनी एक ट्विट करत सरकारवर आरोप केला आहे. ‘महाराष्ट्र सरकार सुडाच्या भावनेतून भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. जर सुरक्षा कपातीनंतर काही बरे वाईट झालं तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडीची असेल हे याद राखा,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसंच, ‘आणखी कोणा कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचे दुस्साहस करत आहे. जर सुरक्षा कपाती नंतर काही बर वाईट झाल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी #MVA ची असेल हे याद राखा. आणखी कोणा कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार? @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @CPMumbaiPolice
— Ram Kadam (@ramkadam) January 10, 2021
फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे. याआधी अमृता फडणवीस यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तर नवीन आदेशानुसार आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर, रिपाइंचे नेते रामदास आठवले आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’