हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकमेकांवर टीकास्त्र डागली जात आहेत. या पक्षातील मंत्रीही एकमेकांवर निशाणा साधत आहेत. नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार कार्यक्रमप्रसंगी शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. यावेळी मंत्री दानवे यांनी “सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे,” असे चॅलेंजही दिले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी कार्यक्रमात शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना बाबर अशी उपमा दिली. “मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे. अब्दुल सत्तार खूप झाले, 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2 हजार 400 कोटींचा केला. सत्तार व माझे पैसे एकत्र करू म्हणावे. मग बघू कोण हरते ते, असे आव्हानही यावेळी मंत्री दानवे यांनी दिले.
मंत्री दानवे यांनी शिवसेना पक्षावर तसेच शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहार. त्यामुळे मंत्री दानवे यांच्या टीकेला शिवसेना पक्षातील नेते तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.