हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील तीन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक कारणांवरून एकमेकांचे चिमटे काढण्याचे अनेक किस्से घडले. असाच किस्सा निकटच्या पार पडलेल्या अधिवेशनात घडला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनच्या खर्चावरून टीका करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. “मंत्र्यांच्या पगारापेक्षा पेंग्विनचा महिन्याचा खर्च जास्त आहे. वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विन वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार 2 लाख 52 हजार किंवा 53 हजार आहे. पण पेंग्विनचा 6 लाख आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
सध्या मुंबईतच विधिमंडळाचे अधिवेशन हे हिवाळी असले तरी वादळी ठरले. मात्र, यावेळी विरोधकांनी अनेक मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनवरील खर्चावरून राज्य सरकावर टीका केली. तसेच पेंग्विनच्या खर्चाची तुलना थेट राज्यातील मंत्र्यांच्या पगाराशी केली. यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या मंत्र्यांच्या पगारापेक्षा पेंग्विनवर होणारा खर्च पाहता तो वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार 2 लाख 52 हजार किंवा 53 हजार आहे. पण त्याचा (पेंग्विन) 6 लाख आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते कि आमची मानसिकता किती भिकारी असावी.
मरावे आणि पेंग्विन व्हावे..! pic.twitter.com/4IKZ8Ew2ZH
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 24, 2021
मुंबईच्या राणीबागेत असलेले पेंग्विन आणि त्याच्यावर केला जात असलेला खर्च हा सामान्य मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या विषयावरून अनेकवेळा भाजप नेते नितेश राणे यांनीही राजय सरकावर टीका केली आहे. दरम्यान, काल भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करताना थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरच खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.