दीड वर्षात सरकारच्या चुकीमुळे एसटीला सहा हजार कोटींचा तोटा; सुधीर मुनगंटीवार यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेत्यांकडून सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. “राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा केली जात आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीत एकजरी निर्णय घेतला तरी महामंडळ फायद्यात पडले. दीड वर्षात सरकारच्या चुकीमुळे सहा हजार कोटींचा तोटा झाला, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा एसटी महामंडळाला या सरकारने सर्वात जास्त निधी दिला होता. त्या काळात सातशे पेक्षा जास्त बसेस खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. माझा सरकारला एकच सवाल आहे कि राजकारणात शिमगा का करतायत? अर्धवट व्हिडीओ दाखवून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम काही नेत्यांकडून केले जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना धाक दाखवलयास खबदार. लोकशाहीत तुम्ही अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. धाक दाखवण्याचा धंदा बंद करावा. एकीकडे आमचे राज्य एक नंबर असेल असा दावा केला जातो. कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जातो तो पगार महाराष्ट्रात दिला जात नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार आहे, मग एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याचे कारण काय? हा भेदभाव सरकारने थांबवला पाहिजे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

Leave a Comment