कोणतेही बटन दाबा मत भाजपला जाणार, मोदीच जिंकणार.., EVM मशीन घोटाळ्याची पोलखोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशा काळातच एका भाजपच्या नेत्याने खळबळजनक वक्तव्य केले आहे. EVM वर नोटा, कार, हात यापैकी कोणतेही बटण दाबा मात्र मत भाजपलाच जाणार आणि मोदीच जिंकणार असा थेट दावा तेलंगणा येथील खासदार डी. अरविंद यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोदी जिंकणार याची पोलखोल झाली आहे. तर या वक्तव्यानंतर विरोधकांकडून देखील भाजपवर टीका केली जात आहे.

खासदार डी. अरविंद यांचा नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी, येत्या निवडणुकांमध्ये भाजपच जिंकून येईल असा दावा केला आहे. तसेच, निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम मशीन हायजॅक केल्या जातात असे अरविंद यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोग काही कारवाई करणार आहे का? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. तर या संदर्भात चौकशी करण्याची मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

EVM मशीनमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांबाबत आजवर भाजपावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. तसेच, अनेक ठिकाणी निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाल्याचे देखील उघडकीस आले आहे. यामध्येच आता भाजपच्या नेत्याने असा दावा केल्यामुळे विरोधकांना हा मुद्दा उचलून धरायला बळ मिळाले आहे. तसेच, भाजप निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करू शकतो असा आरोप विरोधकांकडून लावण्यात येत आहे.

दरम्यान, 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी ट्रक आणि टेम्पोंमध्ये ईव्हीएम मशीन सापडल्या होत्या. तर एका आरटीआयच्या अहवालानुसार असे समोर आले होते की, 2016 ते 2018 या कालावधीत देशात 19 लाख ईव्हीएम गायब झाल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता भाजपच्याच नेत्याने या घोटाळ्याविषयी उघडपणे खुलासा केल्यामुळे राज्यात EVM मशीन घोटाळा प्रकरण पुन्हा पेटले आहे.