मुंबई प्रतिनिधी। तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.
काँग्रेस कडून शपथ घेणारे नितीन राऊत हे देखील नेते होते. महाविकास आघाडीचे सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते सोमवारी नागपुरात पहिल्यांदाच आले. त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.’यापूर्वीच्या भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले आहे. राज्यावर तब्बल ६ लाख ७१ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे’, अशी टीका राज्याचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तसेच ‘भाजपाने विदर्भाला कंगाल केले आहे’ असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला आहे.