उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक; आशिष शेलारांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या आमदार आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला. “आपल्या राज्यात लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक आहेत. ठाकरें विरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. ही जनता त्यांना संताप दाखवून देईल,” अशी टीका शेलार यांनी केली आहे.

यावेळी आमदार शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. टीका करताना शेलार म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी एक गर्जना केली होती की, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत.

उद्धव ठाकरे व कोकण वासीयांबद्दल बोलताना शेलार म्हणाले की, ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळाले की ठाकरे यांच्या पोटात का दुखते? असा सवाल शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंविरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही शेलार यांनी दिला.

Leave a Comment