त्यासाठी घराची कडी काढावी लागते; भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भटखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे. “काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं,” असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजप आमदार भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ” काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते, फायली चाळाव्या लागतात, रात्री अपरात्री फोन घ्यावे लागतात. थोडक्यात काम करावं लागतं,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तसेच कोरोना परिस्थितीत सामोरे जाव्या लागणाऱ्या संकटाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या अनुभबद्दल भाजप आमदार भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.

Leave a Comment