हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत हा पक्ष केव्हाही विसर्जित होऊ शकतो अशी बोचरी टीका केली आहे.
आमचा पक्ष लोकशाही पद्धतीनं चालणारा आहे असं राष्ट्रवादीवाले वारंवार सांगत असतात. मात्र या पक्षात खरंच लोकशाही आहे का? हा प्रश्नच आहे. या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलत नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली अशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे अस म्हणत हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, अशी टीका पडळकरांनी केली.
शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला आहे.




