हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे १०- २० शरद पवारांना खिशात घेऊन फिरतात अशी टीका त्यांनी केली आहे. गोव्यातील विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी मुंबईत सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते.
पडळकर म्हणाले, शरद पवार हे जेष्ठ असले तरी ते श्रेष्ठ नाहीत. काहीही केलं तरी ते मीच केलं, माझ्यापेक्षा कोणीही पुढे जाता काम नये असे त्यानं वाटते. मात्र देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात खालून फिरतात. त्यांच्यापेक्षा किती तरी प्रगल्भ नेतृत्त्व हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे अशी जोरदार टीका पडळकरांनी केली. विश्वासघातकीपणा, लबाडीपणा, गद्दारीपणा, राष्ट्राच्या विरोधातील भूमिका असे विषय शरद पवारांकडे आहेत असेही पडळकर म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबियांवर तोंडसुख घेत आहेत. कोरोना काळात शरद पवार हेच महाराष्ट्राला लागलेला मोठा कोरोना आहे असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं होत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हि पडलकरांविरोधात आक्रमक झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे