हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यासह इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासकरून गोव्यात विजय मिळवल्याबद्दल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्रात आता आगामी निवडणुकीत 2024 मध्ये भाजपचेच सरकार येणार आहे. हे सरकार येणार आणि सत्तांतर होणार हे अटळ आहे,” असे म्हंटले. त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही. चार राज्यात जिंकले म्हणून इथे धाबे दणाणायचे कारण नाही, असे पाटील यांनी म्हंटले .
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, काहीही झालं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. आज भाजपचा विजय झाला आहे, उत्साहाच्या भरात असे दवे करणं स्वाभाविक आहे. विजय तो विजय असतो, ज्यांचा पराभव झाला त्यांनी विचार करावा. पराभव ज्यांचा झाला त्यांनी मान्य करावा.
यूपीमध्ये 1 कोटी 20 लाख बसपाला मतं मिळाली, पण एक आमदार निवडून आला. याचा अर्थ सर्व विरोधक एकत्र आले असते तर चित्र वेगळं असतं. महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्यामळे सरकार काही पडणार नाही. भ्रष्टाचारी फक्त भाजप सोडून इतर पक्षात आहेत,असा दावा मोदींनी केलेल्या नाही. त्यामुळे भाजप पक्षात जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कारवाई होत नाही आहेत पुरावे देण्यात आले पण त्यांच्यावर कारवाई होत नाहीये.
मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करत आहे. काँग्रेसला सल्ला देणं योग्य नाही. त्यांचे नेते अंतर्मुख होऊन चर्चा करतील. यंत्रणा आक्रमक होतील की भाजप आक्रमक होईल हे येणाऱ्या काळात कळेल, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले.