“अरे, यहां तो सिर्फ घर नहीं, पुरी सरकारही कांच से बनी है !”; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर टीका केली. त्यांच्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला आहे. “अरे, यहां तो सिर्फ घर नहीं, पुरी सरकारही कांच से बनी है !, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करीत ठाकरे सरकार मधील घोटाळेबाज मंत्र्यांची व नेत्यांची यादीच समोर ठेवली आहे. पडलकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अनिल देशमुख इतके महिने फरार, संजय राठोडचा मुलीवर अत्याचार, अनिल परबांचा बदलींचा कारभार, संजय राऊतांनी बुडवलेला कर, हसन मुश्रीफांच्या जावयाचं टेंडर, मलिकांचा जावई गांजा बहाद्दर…अरे, यहां तो सिर्फ घर नहीं, पुरी सरकारही कांच से बनी है !, असे ट्विट करीत पडळकरांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

 

भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर टीका केली जाते. दरम्यान त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेले घोटाळे पडलकरांनी सांगत मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.

Leave a Comment