हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी खासदार संजय राऊतांनी लिहलेल्या अग्रलेखावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत? असा सवाल विचारत पडलकरांनी घणाघाती टीकाही केली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला आहे. पडळकरांनी “अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो कायद्याच्या’ फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. पोलिसांना आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्या वरूण देसाईंवर कारवाई का केली नाही?”
अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो कायद्याच्या' फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील.@rautsanjay61@BJP4Maharashtra @ShivSena @SaamanaOnline pic.twitter.com/hPsWtHQ9f7
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 26, 2021
बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघडं पाडलं. पण तुम्ही आज त्यांचाच उधोउधो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मानी उजळ माथ्याने महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो कायद्याच्या’ फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे पडळकरांनी म्हंटले आहे.