हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधील नेत्यांकडून शिवसेनेला धारेवर धरले जातेय. दरम्यान आज भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. आता ‘जनाब राऊत एमआयएम की मुहब्बत कौन है?’ असा सवाल पडळकरांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनातून करण्यात आलेल्या टीकेला पडलकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ” शिवसेना पक्षातील 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाहीतर अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती.,” असावं पडळकर यांनी म्हंटले आहे.
#ओवीसीला आलिंगन घालून मालेगाव व अमरावतीत सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला होता.आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’हे #महाराष्ट्राला माहितीये.#महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि कोलांट्या उड्या मारता.हे रोजच मनोरंजन बंद करा.@rautsanjay61 @ShivSena @SaamanaOnline pic.twitter.com/HQxNRGNKdJ
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 27, 2021
यावेळी पडळकरांनी हिंदुत्वाच्या मुद्यांवरून शिवसेना व राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नसल्याचे पडळकरांनी म्हंटले आहे.