हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवारांनी MPSC च्या जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. यावरून यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गेला. त्यानंतरही अजित पवारांनी रिक्त जागा भरण्याचा दिलेला शब्द पाळला नसल्याने त्यांना शेवटचा इशारा आहे. जर ३० सप्टेंबर पर्यंत रिक्त जागा भरल्या नाही तर आंदोलनाला सामोरं जा,” असे पडकरांनी म्हंटले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर आकाउंटवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गेला. त्यानंतरही विधीमंडळात ३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरू म्हणणाऱ्या अजित पवारांनी आजपर्यंत आपला शब्द पाळला नाही. आता शेवटचा इशारा. जर ३० सप्टेंबर पर्यंत रिक्त जागा भरल्या नाही तर आंदोलनाला सामोरं जा,”
#ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे #स्वप्नील_लोणकरचा जीव गेला. त्यानंतरही विधीमंडळात ३१ जुलै पर्यंत #MPSC च्या सर्व रिक्त जागा भरू म्हणणाऱ्या #अजित_पवारांनी आजपर्यंत आपला शब्द पाळला नाही. आता शेवटचा इशारा,जर ३० सप्टेंबर पर्यंत रिक्त जागा भरल्या नाही तर आंदोलनाला सामोरं जा. pic.twitter.com/fQ00rFUZQL
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 27, 2021
आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा MPSC च्या सर्व रिक्त जागेचा मुद्दा समोर आला आहे. यावरून आता भाजपकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला जाणार यात शंका नाही.