हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यु मध्ये होणाऱ्या वाढीमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. दरम्यान उत्तर प्रदेश मधील भाजपा आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांना ICU बेड मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. त्यामध्ये, आपल्याला बेड मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, केसर सिंह गंगवार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विशालनं एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारबद्दल रोष व्यक्त केला.
‘हेच का उत्तर प्रदेश सरकार? त्यांना आपल्याच आमदारावर उपचार करता येत नाहीत. मी कित्येकदा मुख्यमंत्री कार्यालयाला फोन केले. पण कोणाची टाप आहे फोन उचलण्याची. धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी!’ अशा शब्दांत विशाल यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. त्यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे
18 एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.