संजय राऊतांना देशमुख- मलिकांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडी ने दणका दिला आहे. राऊतांचे अलिबाग येथील प्लॉट आणि दादर येथील राहत्या घरावर ईडी ने जप्ती आणल्यानंतर विरोधकांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी करत त्यांच्यावर सडकून टिका केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे यांनी राऊतांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी. त्यांना आता बाहेर ठेऊन काहीही उपयोग नाही. संजय राऊतांना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

सूड भावनेतून हे सर्व सुरू- अदित्य ठाकरे
दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी भाष्य करत हे सर्व सूड भावनेतून सुरू असल्याचे म्हंटल आहे.धमक्या देऊन कारवाई होऊ लागल्या आहेत हे अतिशय धोक्याचं आहे. त्यामुळे देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज आहे. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.