औरंगाबाद | आपल्या मतदारसंघातील रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी पकडल्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाली. आ. बंब यांच्याबातची ही घटना आज साडेबाराच्या सुमारास औरंगपुरा भागात घडली. यावेळी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पोलीसांना झापले. तर नाकाबंदी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेही तुम्ही नीट बोला… व्यवस्थित बोला, मला रिसपेक्ट देवून बोलायचं असा उलटं उत्तरही पोलिसांने आ. प्रशांत बंब यांना दिले.
औरंगपुरा येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका तरुणाला थांबविले होते. कोरोना रुग्णाला पाण्याची बाटली आणि बिस्कीट पुडा घेण्यासाठी आलो असल्याचे, तरुणाने पोलिसांना सांगितले. तरूण सांगितलेले कारणांची पोलिसांनी शहानिशा केली. त्यानंतर खरोखरच रुग्ण दाखल असल्याचे कळले.
दरम्यान, या घटनेची आमदार प्रशांत बंब यांना माहिती मिळाली. तेंव्हा ते औरंगपुरा येथे पोहोचले, व पोलिसांना म्हणाले, तुम्ही बाहेर निघण्याचे कारण कन्फर्म केले आहे. आता या तरुणाला सोडा असे आ. बंब पोलिसांना म्हणाले. यावेळी तेथे असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि आमदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाली. यावेळी आ. बंब यांनी पोलिसाला जाब विचारत झापले. तर पोलिसानेही नीट बोला… व्यवस्थित बोला, मला रिसपेक्ट देवून बोलायचं असा चांगलेच उत्तर दिले.