बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीवरून भाजपाचे राज्यातील नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे, अशा शब्दात दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज्य सरकारवर या प्रकरणावरून टीका करतानाच प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण देखील केले. याबातची माहिती दरेकरांनी ट्विटद्वारे दिली.

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या प्रकरणात अद्याप दोषींना शिक्षा झाली नसल्याचा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. “पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही”, असं दरेकर म्हणाले आहेत.

सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली आहे.

Leave a Comment