हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करा कोरोना टाळण्यासाठी दहीहंडी साजरी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपासह गोविंद पथकांकडून संताप व्यक्त होतोय. “घरात बसून सबुरीचे सल्ले आम्हाला देऊ नये, घाटकोपर येथे कोणत्याही स्वरूपात दहीहंडी भरवणारच” असा इशारा भाजपचे आमदार राम कदमांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे.
भाजप आमदार राम कदमांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, दहीहंडी उत्सव आयोजकांसोबत ऑनलाईन पद्धतीने चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोना प्रमाण वाढत असून त्यात कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये, असे सांगितले आहे. राज्य सरकारचा दहीहंडी सणांबाबतचा कोणताही फतवा काढल्यास आम्ही तो मान्य करणार नाही. कोणत्याही स्वरूपात आम्ही दहीहंडी साजरी करणारच.
#दहीहंडी होणारच.. घरात बसुन सबुरीचे आम्हाला नकोत.. #बार उघडता त्यांना नियम लावता आणी हिन्दू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच .. pic.twitter.com/x1YB2512p3
— Ram Kadam (@ramkadam) August 23, 2021
राज्यात बार, दारुचे ठेके उघडताना राज्य सरकारला कोरोनाची तिसरी लाट दिसत नाही. हिंदुंची मंदिरं..तीही नियमांसहीत उघडताना तिसरी लाट आडवी कशी येते? दारुची दुकाने कोरोनाप्रूफ आहेत की वेगले चिलखत घालून बसली आहेत?” हे आधी राज्य अरकारने स्प्ष्ट करावे, असेही आमदार राम कदम यांनी म्हंटले आहे.