मुख्यमंत्री ठाकरे मराठवाड्यात नुसते पर्यटनाला येऊ नका; जगजितसिंह पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येथील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेली घास पाण्यात वाहून गेला आहे. येथील नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री ठाकरे लवकरच दौरा करणार असल्याने यावरुन भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहात पर्यटनासाठी नाही. त्यामुळे पंचनाम्यात वेळ घालवू नका, अगोदर मदत जाहीर करा,” असे आमदार पाटील यांनी म्हंटले आहे.

मराठवाड्यातील नुकसानीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज ठाकरेंवर टीका करताना भाजप आमदार पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात फक्त पर्यटनाला येवू नये. आधी मदत जाहीर करावी त्यानंतर दौरा करावा. अगोदर मदत जाहीर करुन जर दौरा केला तर त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागत करु.”

मराठवाड्यातील शेतीचे व शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची सध्या जास्त आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करणे गरजेचे आहे. अशावेळी शेतीमालाचे 100 टक्के नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.